By  
on  

दिवाळीच्या फराळासाठी आठवडाभर बसतो अमये वाघ, केली गमतीशीर पोस्ट

दिवाळीचा सण उत्साहाचा मंगलमय असा सण आहे. या दिवाळी सणाच्या निमित्ताने घरात गोडधोड पदार्थ म्हणजेच फराळ केला जातो.  मनोरंजन विश्वातील कलाकारही दिवाळीचा सण उत्साहात साजरा करतात. अनेक कलाकारांना फराळ बनवायला आणि खायला आवडतं.

अभिनेता अमेय वाघला दिवाळीचा फराळ प्रचंड आवडतो. म्हणूनच त्याने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. सोशल मिडीयावर मॉर्निग रन सेल्फिचे ट्रेंड पाहायला मिळतात. सकाळी अनेक सेलिबिटी त्यांचे फोटो पोस्ट करतात. अमेय वाघनेही नुकताच एक मॉनिंग सेल्फि पोस्ट केला आहे. 

या पोस्टमध्ये तो लिहीतो की, "आत्ताच ते “morning run” वाले selfie टाकून घेतो! कारण एकदा काय मी दिवाळीच्या “फराळाला” बसलो की मग आठवडाभर हलायचो नाही !"

 

तेव्हा आठवडाभर अमेय हा फराळावर असा ताव मारतो हे पोस्टमध्ये सांगीतले आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive