'कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्यासाठी ‘मिस्ड कॉल’ द्या

By  
on  

सामान्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी सोनी मराठी वाहिनी घेऊन येत आहे सर्वांचा लाडका कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’. नागराज मंजुळे हे हॉट सीटवर बसून हा कार्यक्रम होस्ट करणार आहेत.  या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फक्त एका तुम्हाला ‘मिस्ड कॉल’द्यायची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण अगदी बिनधास्तपणे समोरील व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी मिस्ड कॉल देतो त्याचप्रमाणे अचूक उत्तरासाठी तितक्याच बिनधास्त पध्दतीने मिस्ड कॉल देऊन या कार्यक्रमात सामिल होण्याची संधी चुकवू नका. कारण उत्तर शोधलं की जगणं बदलतं.कोण होणार करोडपती या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ११ ते २० मार्च या दरम्यान रजिस्ट्रेशन्स सुरु राहणार आहेत. त्यासाठी मिस्ड कॉल द्या 9164291642 किंवा सोनी लिव्ह (Sony Liv) ऍपवर रजिस्टर करा.
आतापर्यंत सोनी मराठीने मालिकेतून हाताळलेल्या विषयांना, कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. मालिकेच्या विशेष भागांचे आणि एकंदरीत या वाहिनीचे कौतुक करण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया पोहचवल्या आहेत. सोनी मराठीने देखील प्रेक्षकांचा विचार प्रथम केला असून आता देखील त्यांच्यासाठीच, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घेऊन येत आहेत. या कार्यक्रमाचे होस्टिंग कोण करणार, ‘हॉट सीटवर स्पर्धकाच्या समोर कोणता होस्ट असणार?’, ‘लाईफलाईनची मदत घ्या’ असे देखील सांगणारा होस्ट नेमका कोण असेल असे प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच उपस्थित झाला असणार. कोण असेल या कार्यक्रमाचा होस्ट याचं अचूक उत्तर मिळालेले नसाताना प्रेक्षकांनी अनेक कलाकारांचे अंदाज बांधले, अनेकांच्या नावांची उजळणी देखील झाली. पण सोनी मराठीने होस्ट कोण याचं उत्तर देतं एक धमाकेदार, अफलातून सरप्राईज प्रेक्षकांना दिलं आहे. होस्टचं नाव ऐकताच आणि त्याला पाहताच आता सर्वजण सरप्राईज्ड होणार यात मुळीच शंका नाही... अशाचप्रकारे सोनी मराठी अजून काय-काय आश्चर्यचकीत करणारे धक्के देणार आहेत हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा सोनी मराठी.

 

https://twitter.com/sonymarathitv/status/1103857370529071104

Recommended

Share