अभिनेत्री मानसी नाईकने नुकतच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत साखरपुडा केला आहे. नुकतीच मानसीने साखरपुड्याची गोड बातमी सोशल मिडीयावर दिली होती. आता प्रदीपच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन मानसी करतेय. प्रदीपच्या वाढदिवसानिमित्ताने प्रदीपसोबतचे खास फोटो शेयर केले आहेत.
मानसी या पोस्टमध्ये लिहीते की, 'मला तुला प्रोत्साहन द्यायचय, प्रेम करायचय. तुझी स्वप्न पूर्ण करत असताना मला तुझ्यासोबत रहायचय, तुझ्या मार्गातील प्रत्येक पावलावर तुला प्रोत्साहन द्यायचं आहे. जेव्हा तुझा दिवस वाईट जाईल तेव्हा तुला हसवायचं आहे. प्रत्येक दिवशी मला तुला माझ्या प्रेमात पाडायचं आहे. नेहमीच तू माझ्यासाठी काय करु शकतो हे महत्त्वाचं नाही तर मी तुझ्यासाठी काय करु शकते हे देखील महत्त्वाचं आहे. माझ्या मते हे प्रेम आहे. तू तुझं लक्ष्य साध्य करशील ही इच्छा. मी तुझी होण्यासाठी खूप भाग्यवान आहे. मी श्रीमंत महिला आहे कारण माझा पति श्रीमंत मनाचा आहे."
मानसीने याचवर्षी तिच्या वाढदिवसाला ती प्रेमात असल्याच कबुल केलं होतं. वाढदिवसाला मानसीने तिचा प्रदीपसोबतचा फोटो शेयर करुन सगळ्यांना ती प्रेमात असल्याची गुड न्यूज दिली होती. त्यानंतर सोशल मिडीयावर मानसी आणि प्रदीपचे व्हिडीओ आणि फोटो चांगलेच चर्चेत राहिले.
आता साखरपुड्यानंतर मानसी आणि प्रदीप लग्नबंधनात कधी अडकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलय.