By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री नेहा पेंडसेने या हिंदी सिनेमाच्या सेटवरील फोटो केले शेयर

अभिनेत्री नेहा पेंडसे ही सोशल मिडीयावर सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसतेय. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मिडीयावर पोस्ट करते. सोशल मिडीयावर नेहाचा मोठा चाहतावर्ग आहे. नेहाने नुकतेच काही थ्रोबॅक फोटो शेयर केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

 

'सुरज पे मंगल भारी' या ओटीटीवर रिलीज झालेल्या सिनेमात नेहा पेंडसेची देखील महत्त्वाची भूमिका आहे. याच भूमिकेच्या निमित्ताने नेहाने या सिनेमाच्या सेटवरील, वॅनिटीमधील काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहाचा फ्लोरल साडी लुक पाहायला मिळतोय. 'सुरज पे मंगल भारी' या सिनेमा मनोज वाजपयी, दिलजीत दोसांज, फातिमा सना शेख हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमातील नेहाच्या छोट्याश्या भूमिकेचही कौतुक होत आहे.

आगामी 'जून' या सिनेमात नेहा अभिनेता सिद्धार्थ मेननसोबत झळकणार आहे. तेव्हा नेहाच्या आगामी प्रोजेक्ट्ससाठीदेखील तिचे चाहते उत्सुक असतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive