By  
on  

अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या साडीतल्या घायाळ करणाऱ्या अदा

दिवाळीच्या निमित्ताने 'सैराट' फेम रिंकू राजगुरुने तिचे काही खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. विशेषकरून यात तिचे साडी लुक पाहायला मिळत आहेत. यातच रिंकूने आणखी काही साडीतले सुंदर फोटो शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये रिंकूने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. या साडीतील रिंकूच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत. 

रिंकूने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेले साडीतील खास फोटो चांगलेच चर्चेत आले होते. तेव्हा सध्या रिंकूचं साडीप्रेम पाहायला मिळतय. 

लवकरच रिंकू तिच्या नव्या सिनेमासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'छूमंतर' या द्विभाषिक सिनेमात रिंकू झळकणार आहे. नुकतच रिंकू या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण करून लंडनहून परतली आहे. या सिनेमात रिंकूसह प्रार्थना बेहेरे, सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive