By  
on  

"कुछ साल पेहेले की बात हैं" म्हणत कॉमेडी क्विन विशाखा सुभेदार यांनी शेयर केली ही आठवण

मनोरंजन विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर त्यांच्या आयुष्यातील विविध गोष्टी शेयर करत असतात. त्यातच थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंडही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. यात अनेक कलाकार त्यांचे जुने फोटो, जुन्या आठवणी शेयर करतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारी कॉमेडी क्विन विशाखा सुभेदार यांदी देखील एक जुनी आठवण सहजच शेयर केली आहे.

विशाखा यांनी पतिसोबतच 22 वर्षे जुना फोटो पोस्ट केला आहे. पण लग्नाच्या वाढदिवसाचं निमित्त नसल्याचंही त्या या पोस्टमध्ये म्हणतात. विशाखा या पोस्टमध्ये लिहीतात की, "लग्नाचा वाढदिवस नाही आज. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जवळपास 22 वर्षे." विशाखा यांच्या या फोटोला अनेक लाईक्स आणि कमेंट्सही मिळाल्या आहेत.

 

विशाखा यांनी आत्तापर्यंत अनेक नाटक, मालिका, सिनेमांमध्ये काम केलय. त्यांनी अनेक विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना हसवलयं. सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमातून त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive