बॉलिवूडकरांचं मराठी प्रेम तर आपल्याला माहितच आहे. मग ह्यात मराठमोळी बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित कशी बरं मागे राहिल.‘बकेट लिस्ट’ सिनेमाद्वारे या सौंदर्यवती अभिनेत्रीने मराठी सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केलं. तिच्या ह्या पहिल्या-वहिल्या मराठी सिनेमाचं बरंच कौतुक झालं, त्यानंतर डान्स रिएलिटी शोच्या परिक्षणाची जबाबदारी आणि नुकताच प्रदर्शित झालेला टोटल धम्माल या सिनेमामुळे माधुरी पुन्हा एकदा माध्यमांसमोर मुख्य प्रवाहात आली.
माधुरी दीक्षितने मराठीत पदार्पण तर केलंच पण लवकरच ती मराठी सिनेमांच्या निर्मिती क्षेत्रात उतरतेय. माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला पहिला-वहिला मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महत्त्वाचं म्हणजे माधुरीच्या आर एन एम प्रोडक्शनची निर्मिती असलेला ‘15 ऑगस्ट’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर मार्चअखेर प्रदर्शित होत आहे.
एका आघाडीच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत माधुरी म्हणते, “ सध्या माझ्या ‘15 ऑगस्ट’ या मराठी सिनेमाच्या निर्मिती आणि प्रदर्शनाच्या कामात व्यस्त असून हा सिनेमा नेटफिल्क्सवर या महिन्याअखेर प्रदर्शित होतोय. या सिनेमाच्या कथानकापासून ते पूर्णत्त्वापर्यंतचा संपूर्ण प्रवास मी छान अनुभवलाय. खुपच उत्साही होतं हे प्रोजेक्ट. मला पुन्हा अशी मराठी सिनेमाची निर्मिती करायला आवडेल.
https://www.instagram.com/p/BglMvbUHvho/
मृण्मयी देशपांडे, सतीश पुळेकर, आदिनाथ कोठारे, राहुल पेठे, वैभव मांगले, जयंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मागच्या वर्षी फेब्रुवारीत माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्या हस्ते ‘15 ऑगस्ट’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला होता.
https://www.facebook.com/DrShriramNene/videos/1057757664366685/