प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वेने काही महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रियांकाच्या घरी नवा पाहुणा आला. त्याचं युवान असं नाव ठेवण्यात आलं. या काळात प्रेग्नंसी आणि युवानचा जन्म यात जवळपास नऊ महिने प्रियांका तिच्या कामापासून दुरावली होती.
मात्र आता प्रियांकाने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. नुकतच प्रियांकाने दोन गाणी रेकॉर्ड केली आहे. तब्बल 9 महिन्यांनी घराबाहेर पडून प्रियांकाने स्टुडिओत रेकॉर्डिंग केलं. प्रियांकाने नुकतेच या रेकॉर्डिंगचे खास फोटो शेयर केले आहेत.
ती या पोस्टमध्ये लिहीते की, "हे खूप आश्चर्यकारक वाटतय पुन्हा माझ्या आवडत्या जागी येऊन. माझी कामाची जागा. जवळपास नऊ महिन्यांनी घराबाहेर पडले. आणि दोन सुंदर गाणी गायली. जी प्रणवने कम्पोज केली आहेत. समृद्धी आणि वर्षा भावेने लिहीली आहेत. आणि बाळ उठण्याआधी घरी पोहोचल. हुरेरे.."
प्रियांका आणि सांरग कुलकर्णी यांच्या आयुष्यात युवानच्या येण्याने आनंद आलाय. याशिवाय आता प्रियांकाने तिच्या कामाला पुन्हा सुरुवात केल्याने हा आनंद द्विगुणीत झाला असेल यात शंका नाही.