फिल्मफेयर ओटीटी अवॉर्ड्समध्ये अभिनेत्री स्पृहा जोशीला या भूमिकेसाठी नामांकन

By  
on  

ओटीटीकडे वळलेला मोठा प्रेक्षकवर्ग बघता आता फिल्मफेयर ओटीटी अवॉर्ड्सही सुरु करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये अनेक वेब सिरीज आणि त्यातील कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्काराची नामांकन यादी नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. 

या नामांकनात अभिनेत्री स्पृहा जोशीचं सुद्धा नाव आहे. 'रंगबाज फिर से' या वेबसिरीजमध्ये रुक्मिणी नावाची व्यक्तिरेखा स्पृहाने साकारली होती. या व्यक्तिरेखेचं बरचं कौतुक करण्यात आलं होतं. स्पृहाची ही हटके भूमिका चांगलीच लक्षवेधी ठरली. आणि याचसाठी स्पृहाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलारांच्या यादीत नामांकन मिळालं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

 

अभिनेत्री स्पृहा जोशने सोशल मिडीयावर पोस्ट करून नुकतीच याविषयीची माहिती दिली आहे. ती लिहीते की, "फिल्मफेयर ओटीटी अवॉर्ड्स 2020 साठीची नामांकन प्रकिया सुरु झाली आहे. आणि रंगबाज फिर से मधील माझी रुक्मिणीची भूमिका सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या ड्रामा कॅटेगरीमध्ये आहे. तुम्हाला विनंती आहे की रुक्मिणीला वोट करा."

स्पृहाने या पोस्टमधून चाहत्यांना वोट्स करण्याची विनंती केली आहे. तेव्हा या ओटीटी अवॉर्ड्समध्ये कोणते कलाकार आणि कोणती वेब सिरीज बाजी मारते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share