अभिनेत्री ऋता दुर्गुळे घेऊन येत आहे अमेय वाघ आणि निपुणसोबत खास सरप्राईज

By  
on  

अभिनेता अमेय वाघ आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी हे नेहमीच काहीना काही मजेशीर आणि धमाल घेऊन येत असतात. मग ते कास्टिंग काऊच सारखे व्हिडीओ असो, भाडिपासोबत केलेले स्टँडअप असो किंवा त्यांच्या सिनेमांमधून केलेलं काम असो. अमेय - निपुण काहीतरी व्हिडीओ करणार म्हणजे सगळ्यांनाच उत्सुकता असते. आणि आता पुन्हा दोघं असचं काहीसं खास घेऊन येत आहेत. मात्र यावेळी फक्त दोघं नाहीत तर त्यांना साथ आहे एका प्रसिद्ध अभिनेत्रीची.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे अभिनेत्री ऋता दुर्गुळे. अभिनेत्री ऋतासोबत अमेय-निपुण काहीतरी खास घेऊन येत आहेत. या दोघांनी अनेक कलाकारांसोबत विविध मजेशीर व्हिडीओ केले आहेत. पण आता दोघं पहिल्यांदाच ऋतासोबत खास व्हिडीओ घेऊन येत आहेत. नुकतच ऋताने तिच्या सोशल मिडीयावर याविषयीची माहिती दिली आहे.

ऋता सागंते की, "या दोघांसोबत काहीतर कुल शूट केलं आहे. तुम्ही हे पाहण्यासाठी मी वाट पाहू शकत नाही. धन्यवाद निपुण, अमेय मला याचा भाग बनवण्यासाठी. आणि क्षितिज पटवर्धनचं स्क्रिप्ट आवडलं."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta (@hruta12)

 

तेव्हा या खास व्हिडीओसाठी क्षितिज पटवर्धन याने स्क्रिप्ट लिहीलं आहे. तेव्हा अमेय-निपुणसोबत ऋता दुर्गुळे आणि क्षितिजचं स्क्रिप्ट असं कमाल कॉम्बिनेशन असल्यावर धमाल तर येणारच. तेव्हा आता पाहायचीय ती या खास सरप्राईजची. या मंडळींनी नेमक काय खास केलय हे लवकरच समोर येईल.

Recommended

Loading...
Share