पाहा Video : रितेश आणि जेनेलियाने मुलाला अशा खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

अभिनेता रितेश देशमुखने मुलगा रियानच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. पत्नी जेनेलिया आणि मुलांसोबतचे रितेशचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. एवढच नाही तर रितेशचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. यातच आता रितेशने मुलगा रियानसाठी एक खास पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये रितेशने एक खास व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत मुलगा रियान आणि राहिल देखील पाहायला मिळत आहेत. रितेशचे मुलांसोबतचे खास क्षण या व्हिडीओत आहेत शिवाय रियानचेही काही खास क्षण रितेशने टिपले आहेत. "वाढदिवसाच्या शुभेच्छा माझा सिम्बा" असं त्याने कॅप्शनही लिहीलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

तर जेनेलियानेही मुलासाठी एक खास पोस्ट केली आहे. या व्हिडीओत मुलगा रियान आणि राहिलचे खास क्षण आहेत. शिवाय रियान बाळ असतानाचा जेनेलियासोबतचा व्हिडीओही यात आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

रितेश - जेनेलिया दोघांनीही मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने या खास पोस्ट शेयर केल्या आहेत.

Recommended

Loading...
Share