मराठी बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोगने सोशल मिडीयावर एक खास पोस्ट केली आहे. त्याची पत्नी जास्मिनसोबतच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही पोस्ट आहे. लग्नाच्या वाढदिवसासाठी केलेल्या या पोस्टमध्ये पुष्कर आणि जास्मिन पाहायला मिळत आहेत.
26 नोव्हेंबर 2014 मध्ये अभिनेता पुष्कर आणि जास्मिन बाम्हंभट्ट यांनी पुण्यात लगीनगाठ बांधली होती. लग्नाआधी जास्मिन ही एअर होस्टेस होती. एकदा फ्लाईटमधून प्रवास करताना पुष्कर जास्मिनच्या प्रेमात पडला. त्यानंतर या नातं पुढे फुलत जात दोघांनी लग्न केलं.
2017 मध्ये दोघं आई-बाबा बनले. आणि जास्मिनने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव फेलिशा असं ठेवण्यात आलं.
पुष्कर हा मराठी बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून असताना त्याने वारंवार त्याची पत्नी जास्मिन आणि मुलगी फेलिशाचा उल्लेख केला होता. एका टास्क दरम्यान त्याची पत्नी आणि मुलगी बिग बॉसच्या घरात त्याला भेटायला आल्या होत्या.
सोशल मिडीयावरही पुष्कर त्याच्या पत्नी आणि मुलीसोबतचे फोटो , व्हिडीओ पोस्ट करत असतो.