अभिनेता हृषिकेश जोशीला या वेब सिरीजसाठी ओटीटी अवॉर्ड्समध्ये नामांकन

By  
on  

फिल्मफेयर ओटीटी अवॉर्ड्स सुरु झाल्याने आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कलाकृती आणि कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे. तेव्हा विविध वेब सिरीज आणि त्यातील कलाकारांचेही नामांकन प्रदर्शित करण्यात आले आहेत.

ब्रिद या वेबसिरीजसाठी देखील विविध नामांकनं आहेत. या सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेता हृषिकेश जोशीला देखील या सिरीजसाठी नामांकन मिळालं आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या नामांकन यादीत हृषिकेशचं नाव आहे. यानिमित्ताने हृषिकेशने खास पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये हृषिकेश लिहीतो की, "ही संधी साधून मी माझ्या प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.  'ब्रिद' या वेबसिरीजसाठी तुम्ही माझ्या भूमिकेला दिलेल्या प्रेमासाठी सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांनीची ही वेबसिरीज बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. आणि तुमच्या विश्वासामुळे शक्य झालं आहे जे आम्ही आता आहोत. मला हे सांगताना अभिमान होतोय की सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी मला नामांकन मिळालं आहे."

ही आनंदाची बातमी देऊन हृषिकेश जोशीने चाहत्यांना या नामांकनासाठी वोट करण्यास सांगितलं आहे. मयांक शर्मा दिग्दर्शित ब्रिद - इन टू द शॅडोज या वेब सिरीजमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन, अमित साध यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिरीजमधील अभिनेता  हृषिकेश जोशीच्या कामाचही कौतक झालं होतं. तेव्हा आता या ओटीटी अवॉर्ड्समध्ये प्रेक्षकांचा काय कौल असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

Recommended

Loading...
Share