पाहा Photos : असं पार पडलं सई लोकूरचं लग्नाआधीचं देवकार्य, लग्नाला काहीच दिवस बाकी..

By  
on  

अभिनेत्री सई लोकूरच्या लग्नाला काहीच दिवस शिल्लक आहेत. फियान्से तिर्थदीप रॉयसोबत सई लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या 30 नोव्हेंबरला बेळगावात सई आणि तिर्थदीपचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

मात्र सईच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे. नुकताच सईचा लग्नाआधीचं देवकार्यही पार पडलं आहे. यावेळी सईचे आई-वडिल आणि तिर्थदीपही यांच्यासोबतचे काही खास फोटो सईने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

या देवकार्यासाठी सईने खणाची गुलाबी साडी नेसली होती त्यावर केशरी खणाचा ब्लाउज होता. केसात गजरा, मोत्याचे दागिने आणि नथ असा सईचा सुंदर लुक पाहायला मिळाला. यावेळी तिर्थदीपने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

सईने तिच्या परिवारासोबतचेही या देवकार्याचे काही खास फोटो शेयर केले आहेत. 

लग्नाला काहीच दिवस असल्याने सईच्या चेहऱ्यावरील हास्यातला आनंद स्पष्ट दिसतोय. 

Recommended

Loading...
Share