पाहा Photos : लग्नाच्या वाढदिवसाला माधव देवचकेने शेयर केल्या या खास आठवणी

By  
on  

अभिनेता माधव देवचकेने नुकतीच एक खास आठवण सोशल मिडीयावर शेयर केली आहे. निमित्त आहे त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाचं. याच निमित्ताने माधवने त्याच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

माधवने त्याच्या लग्नाचे काही खास क्षण या पोस्टमध्ये शेयर केले आहेत. माधव या पोस्टमध्ये लिहीतो की, "लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी प्रिय बायको. जे हास्य तू मला दिलय त्याने आजही माझं हद्य विरघळतं."

2014 मध्ये माधवने बागेश्रीसोबत लग्न केलं होतं. बागेश्री ही एअर होस्टेस असून माधव आणि बागेश्रीचं लव्ह कम अरेंज मॅरेज आहे. दोघांच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माधवने पत्नीसाठी ही खास पोस्ट केली आहे.

 

Recommended

Loading...
Share