पाहा Photos : रिंकू राजगुरुच्या या फोटोंनी वेधलं सगळ्यांचं लक्ष

By  
on  

सैराटची आर्ची एवढीच आता रिंकू राजगुरुची ओळख राहिलेली नाही. तर विविध भूमिका साकारून रिंकू आता उत्तम अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवताना दिसतेय. सोशल मिडीयावरही रिंकू आता बऱ्यापैकी सक्रिय झाली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्यासोबत सोशल मिडीयावर कनेक्ट होता येतं. 

सोशल मिडीयावर रिंकू विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसतेय. तिचा तिथे मोठा चाहतावर्गही आहे. रिंकू तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सक्रिय असते. तिचे दररोज विविध फोटो तिथे पाहायला मिळतात. तिच्या या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती असते. रिंकूने नुकतेच असेच काही फोटो पोस्ट केले आहेत. रिंकूच्या या फोटोंनी सगळ्यांचच लक्ष वेधलं आहे. लेहेंगा साडीमध्ये मेकअप नसलेल्या लुकमध्येही रिंकूचं सौंदर्य खुलुन दिसत आहे. 

सध्या रिंकू पोस्ट करत असलेल्या फोटोंचं वैशिष्ट्य म्हणजे हे फोटो मेकअप शिवाय असतात. त्यात कोणतच ग्लॅमर नसलं तरी रिंकूच्या सौंदर्याने ते अधीक ग्लॅमरस दिसतात. 

रिंकूच्या या अदांनी तिच्या चाहत्यांना याड लावलं असणार यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share