पाहा Video : अमेय वाघ आणि ऋता दुर्गुळे यांचा फॅशनचा स्टँड अप

By  
on  

अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे एका खास प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत. नुकतीच दोघांनी एक जाहिरात केली आहे. मात्र ही टिपीकल जाहिरातीसारखी नसून त्यात आहे एक धमाल स्टँड अप. आता अमेय वाघ स्टँड अप करतोय म्हटल्यावर धमार तर होणारच. याशिवाय यात ऋता दुर्गुळेही स्टँड अप करताना दिसतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

हा स्टँड अप आहे फॅशनचा. एका फॅशन ब्रँडच्या जाहिरातीसाठी या दोघांनी स्टँड अप व्हिडीओ केला आहे. या निमित्ताने अमेय आणि ऋता पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या फॅशन स्टँड अपचा व्हिडीओ अमेयने नुकताच सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. हा फॅशलनेबल स्टँड अप त्यांच्या चाहत्यांनाही आवडलेला दिसतोय. नेहमीच काहीना काही हटके करणारा अमेय वाघ या स्टँड अप मधून सगळ्यांचं लक्ष वेधतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

काही दिवासांपूर्वी ऋताने अमेय आणि निपुण धर्माधिकारीसोबतच्या फोटोची एक पोस्ट शेयर केली होता. ती याच प्रोजेक्टसाठी होती. तेव्हा अमेय-ऋता या स्टँड अपसाठी एकत्र झळकले तरी आगामी काळात दोघांना पुन्हा एकत्र पाहायला आवडेल अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Recommended

Loading...
Share