पाहा Photos : अंकित आणि रुचिने असा साजरा केला लग्नाचा वाढदिवस

By  
on  

अभिनेता अंकित मोहन आणि रुचि यांनी नुकतच त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलं आहे. नुकताच दोघांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. अंकित आणि रुचिने सोशल मिडीयावर या छोट्याश्या सेलिब्रेशनचे फोटो शेयर केले आहेत. यावेळी केक कापून आणि एकमेकांना गिफ्ट्स देऊन दोघांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे.

'घर आजा परदेसी' या मालिकेत अंकित आणि रुचि या दोघांनी एकत्र काम केलं होतं. याच मालिकेतून दोघांमध्ये प्रेम जुळल. 2015 मध्ये 2 डिसेंबर रोजी दोघांनी लगीनगाठ बांधली होती.

 

अंकित आणि रुचि दोघांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'फर्जंद' या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीतही अंकितने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. 'फत्तेशिकस्त' या मराठी सिनेमात अंकित आणि रुचि या दोघांनी काम केलं होतं.  

 

Recommended

Loading...
Share