By  
on  

पाहा Video : स्वप्निल जोशीचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा झाला प्रयत्न

सेलिब्रिटींच्या सोशल मिडीयावर त्यांच्या चाहत्यांची आणि नेटकऱ्यांची नजर तर असतेच. पण हॅकर्सचाही या सेलिब्रिटींच्या अकाउंटवर डोळा असतो. अनेक सेलिब्रिटींच्या बाबतीत हे घडलं आहे. लाखो आणि हजारोंच्या घरात फॉलोवर्स असलेले सेलिब्रिटींचे सोशल मिडीया अकाउंट या हॅकर्सच्या नजरेत असतात. 

अभिनेता स्वप्निल जोशीच्या बाबतीतही नुकतच असच काहीसं झालेलं आहे. आणि हे सांगण्यासाठी स्वप्निलने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. स्वप्निल या व्हिडीओत त्याचा अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न कसा झाला ते सांगतोय.

 

अनेक सेलिब्रिटींचे अकाउंट अशा प्रकारे हॅक झाले आहेत. काहींना ते अकाउंट परत मिळाले तर काहींना दुसर अकाउंट सुरु करावं लागलं आहे. त्यामुळे या हॅकर्सपासून सावध राहण्याची गरज आहे. स्वप्निलच्या सोशल मिडीया टीमने हॅकर्सपासून त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट वाचवलं आहे. आणि म्हणूनच सावधगिरी बाळगण्यासाठी स्वप्निलने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive