अभिनेता भरत जाधव यांनी नैराश्य आणि त्याविषयी महत्त्वाची गोष्ट सांगणारी एक पोस्ट सोशल मिडीयावर शेयर केली आहे. फेसबुकवर वाचलेली ही पोस्ट त्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी शेयर केली आहे.
या पोस्टमध्ये लिहीलय की, "लाखो जीव घेणारा क्रूर हिटलर ने पण आत्महत्या केली शेवटी.सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करुन घेतात. मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात. आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण करुन कित्येकांना आधार देणारे भैयुजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात. पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही सिंग राजपुतनं आत्महत्या केली नैराश्यातुनआणि आता सहा आठ महिन्यापूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या शीतर आमटे करजगी आपलं जीवन संपवतात. ही झाली सेलिब्रिटींची उदाहरणं. यातुन काय शिकायचं आपण? पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात वर शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी फक्त. त्याचे कष्ट त्यालाच माहित असतात.माणुस वर वर दिसतो तितका खंबीर असेलच असं नाही.... मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या जी आपल्या पर्यंत पोहोचत नसते किंवा त्या आनंदी आणि सुखी चेहऱ्याच्या आड लपवत असतो,लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय...?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली पायात कबरच आहे हे विसरुन चालत नाही. म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या मन मोकळं करा. नैराश्याला पळवून लावा.(फेसबुक वर वाचलेली पोस्ट शेअर करत आहे)"
त्यांनी शेयर केलेल्या या पोस्टमध्ये नैराश्येतून जीवन संपवणाऱ्या काही प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे सुद्धा आहेत. नुकतीच सुशांत सिंग राजपूतची आणि डॉ शितल आमटे यांची आत्महत्या लक्षात घेता भरत जाधव यांनी ही पोस्ट केली आहे. यातून मित्रांकडे मन मोकळं करण्याचा सल्लाही त्यांनी यात दिला आहे. आणि या नैराश्याला पळवून लावण्याचा संदेश ते देत आहेत.