By  
on  

रिंकू राजगुरुच्या आणखी एका व्हिडीओने वेधलं चाहत्यांचं लक्ष

अभिनेत्री रिंकू राजगुरु आता सोशल मिडीयावर विविध प्रयोग करु पाहतेय. सध्या ती तिचे सुंदर व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहे. यात कधी रिंकू फिटनेस फ्रिक, कधी ऑनसेट तर कधी हटके लुकमध्ये पाहायला मिळते. नुकतेच रिंकूने तिचे हटके लुकमधील फोटो पोस्ट केले होते. त्या फोटोंना तिच्या चाहत्यांनी पसंत केलं होतं.

आता याच लुकमधील अवतारात रिंकूने एक सुंदर व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. हा व्हिडीओ पाहुन एखादं साउथ सिनेमातील गाणं पाहतोय की काय असा भास नक्कीच होईल. यात रिंकूच्या सौंदर्याची, व्हिडीओ शूट करणाऱ्याची आणि या व्हिडीओला एडिट करुन लावण्यात आलेल्या गाण्याची देखील कमाल आहेच.

 

रिंकूच्या या व्हिडीओलाही पसंत केलं जातय. सध्या रिंकू सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली असून तिचे विविध लुक्स आणि अपडेट्स तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पाहायला मिळतात. 

Recommended

PeepingMoon Exclusive