भाडिपाच्या मंचावर युवा नेते 'आदित्य ठाकरे'

By  
on  

आजचा तरुणच उद्याची दशा आणि दिशा ठरवणार आहे. नव्याने राजकारणात येणाऱ्या नव्या  नेतृत्वाकडेही आजची तरुणाई आकर्षित होत आहे. राजकीय प्रचार सभा असो किंवा विविध आंदोलने यात तरुणांचा वाढता सहभाग आहे. युवा सेनेच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी आजच्या युवकांचे अनेक प्रश्न मांडत युवा सेनेची बांधणी केली. महाराष्ट्रातील युवकांचे दमदार नेतृत्व म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते.

युवा नेते आदित्य ठाकरे यांचा सध्याचे राजकारण आजच्या तरूणाईच्या प्रश्नांकडे बघण्याचा नेमका दृष्टीकोन कसा आहे हे सगळं जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी भाडिपाच्या ‘लोकमंच’ द्वारे मिळणार आहे. मंगळवार १९ मार्चला शिवाजी मंदीरला सायंकाळी ६.०० वा. संवादक सविता प्रभुणे या आदित्य ठाकरे यांच्यासोबत हा संवाद साधणार आहेत.

‘लोकमंच’ या उपक्रमांतर्गत तरुण मतदार आणि राजकारणी यांच्यातला संवादाचा दुवा साधण्याचे काम करणाऱ्या  भाडिपाच्या ‘विषय खोल’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या भेटीला येणाऱ्या आदित्य ठाकरे यांची विविध विषयांवरील रोखठोक मते या संवादाच्या निमित्ताने जाणून घेता येणार आहेत.

Recommended

Share