पाहा Video : 'समांतर 2' मधील कुमार आणि नीमाची झलक

By  
on  

'समांतर' या वेबसिरीजला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला. आणि आता याच वेबसिरीजचं आता दुसरं सिझन येत आहे. सध्या 'समांतर 2' चं चित्रीकरण सुरु आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेता स्वप्निल जोशी हा कुमारच्या भूमिकेत आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित कुमारची पत्नि नीमाच्या भूमिकेत दिसले होते. आणि आता दुसऱ्या सिझनमध्येही ही जोडी पाहायला मिळणार आहे. पहिल्या सिझनमध्ये अपूर्ण राहिलेली कहाणी या सिझनमध्ये पूर्ण होताना दिसेल.

या सिरीजचं चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरु आहे. आणि याच सेटवरील काही फोटो तेजस्विनीने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

 

तेव्हा समांतरच्या दुसऱ्या सिझनमध्ये काय पाहायला मिळेल ? ही कहाणी कशी पुढे जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Recommended

Loading...
Share