बॉलिवूड सुपरस्टार माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला पहिला मराठी सिनेमा '15 ऑगस्ट'चा ट्रेलर नुकताच उलगडला आहे. एका चाळीतील सर्वसामान्य कुटुंबियांची गोष्ट या सिनेमात गुंफण्यात आली आहे. या ट्रेलरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर घडणा-या अनेक विविध घडामोडींची झलक पाहायला मिळतेय. एकमोकांवर अतोनात प्रेम करणा-या चाळीतील प्रेमी युगुलाचा घरच्यांच्या विरोधामुळे पळून जाण्याचा बेत आहे आणि तोसुध्दा 15 ऑगस्टलाच . तर दुसरीकडे चाळीतील एका लहान मुलाचा हात एका खोल खड्डात अडकल्याने घडणा-या घटना असं काहीसं कथानक या सिनेमात पाहिला मिळणार असल्याचं या ट्रेलरवरुन लक्षात येतं
महत्त्वाचं म्हणजे '15 ऑगस्ट' हा माधुरी दीक्षित निर्मित सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.माधुरीच्या आर एन एम प्रोडक्शनची निर्मिती असलेला ‘15 ऑगस्ट’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर मार्चअखेर प्रदर्शित होत आहे.
https://www.instagram.com/p/BglMvbUHvho/?utm_source=ig_embed
मृण्मयी देशपांडे, सतीश पुळेकर, आदिनाथ कोठारे, राहुल पेठे, वैभव मांगले, जयंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मागच्या वर्षी फेब्रुवारीत माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्या हस्ते ‘15 ऑगस्ट’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला होता.
https://youtu.be/q1YIJyf83tw
स