पुन्हा एकदा घुमणार ‘जय भवानी’चा गजर, सोनी मराठीवर होणार जिजाऊँचं आगमन

By  
on  

महाराष्ट्राचा इतिहास जिज़ाऊँच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. स्वराज्याची मुहूर्तमेढ शिवबांनी रोवली असली तरी त्याचा पाया रचला तो जिज़ाऊँनी. महाराष्ट्राचा स्वाभिमान ऊंचावण्याचं श्रेय राजमाता जिज़ाऊ यांना जातं. स्वराज्याच्या जडणघड़णीत त्यांचं अतुल्य योगदान आहे. हेच जाणून सोनी मराठीने जिज़ाऊँचा जीवनपट रसिकांसमोर आणण्याचं ठरवलं आहे. सोनी मराठीने सोशल मिडियावर ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेचं पोस्टर लॉंच केलं आहे. या पोस्टमध्ये ‘येत आहे’ या कॅप्शनसह या मालिकेचं पोस्टर दिसत आहे. या मालिकेबद्दल अजून कोणताही तपशील जाहीर केलेला नाही. त्यामुळे या मालिकेविषयी रसिकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे.

https://twitter.com/sonymarathitv/status/1107513738981240833

Recommended

Share