स्वप्निल आणि त्याची लाडकी लेक मायराचा हा फोटो तुम्हालाही आवडेल

By  
on  

आपल्याला पडद्यावर दिसणारा अभिनेता रिअल आयुष्यातही अनेक नात्यांच्या व्यक्तिरेखा निभावत असतो. आता अभिनेता स्वप्निल जोशीचंच पाहा ना! स्वप्नीलची पडद्यावरील इमेज दिलफेक, रोमँटिक अभिनेता अशी आहे. पण प्रत्यक्षात स्वप्नीलमध्ये मात्र हळवा बाबा आहे, याचा प्रत्यय त्याच्या फॅन्सना नेहमीच येत असतो. स्वप्नीलने नुकताच त्याचा आणि लेक मायराचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. स्वप्निलने शेअर केलेल्या या फोटोमध्ये स्वप्निल झोपला असून त्याच्या बाजूला शांतपणे बसून मायरा दूध पिताना दिसत आहे. या फोटोसोबत स्वप्निलने ‘मायरा आणि बाबाचा रविवार’ असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोवर नेटिझन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. स्वप्निल सध्या मोगरा फुलला या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा जूनमध्ये रिलीज़ होईल.

https://www.instagram.com/p/BvG7seEFGHK/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

Share