By  
on  

लग्नाच्या वाढदिवसाला स्वप्निल जोशीचा पत्नीसाठी खास मेसेज

अभिनेता स्वप्निल जोशीने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. 2011 मध्ये स्वप्निल जोशी आणि डेंटिस्ट लीना लग्नबंधनात अडकले होते. आणि याच लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने स्वप्निलने लीनासाठी खास मेसेज लिहीला आहे.

स्वप्निल या पोस्टमध्ये लिहीतो की, "मी जेवढं जास्त लिहीतो तितक कमी माहिती आहे, मला अधिक जाणवतं. धन्यवाद लीना माझ्या मुलांची आई होण्यासाठी, माझ्या पालकांची मुलगी, माझ्या परिवाराची अँकर होण्यासाठी आणि माझी बेस्ट फ्रेंड होण्यासाठी. तू एक अद्वितीय व्यक्ती आहेस. मी या गोष्टीचा आदर करतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मिसेस. मी तुझ्यावर प्रेम करतो." या पोस्टमध्ये स्वप्निलने लीनासोबतचा फोटोदेखील पोस्ट केला आहे. 

स्वप्निल आणि लीनाच्या सुखी संसारात दोन गोंडस मुलंदेखील आहेत. मायरा आणि राघव ही दोन गोंडस मुलं त्यांना आहेत. स्वप्निल आणि लीना दोघं अनेक सेलिब्रिटी कपल कार्यक्रमांमधून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive