अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक लवकरच 'चंद्रमुखी' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या सिनेमाचं चित्रीकरण सध्या सुरु आहे. नुकतच या सिनेमाच्या गाण्याचं रेकॉर्डिंगही करण्यात आलं. प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वेने या सिनेमासाठी गाणं गायलं आहे. प्रियांकाच्या सुरेल आवाजात या सिनेमाचं गाणं ऐकायला मिळणार आहे. प्रिसद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे.
प्रियांका बर्वेने या रेकॉर्डिंग दरम्यानचे काही खास क्षण सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "अजय-अतुल यांच्यासोब रेकॉर्डिंग करणं ही नेहमीच सन्मानाची गोष्ट असते. आगामी सिनेमा चंद्रमुखीसाठी काहीतरी खास रेकॉर्ड केल आहे. गुरु ठाकून यांचे गीत आहेत. याशिवाय युवानचं हे पहिलं मुंबई आउटिंग होतं आणि यशराज स्टुटिओशिवाय कोणतं चांगलं ठिकाण असू शकेल. त्याला खूप मजा आली. सारंगचे खूप धन्यवाद आणि माझ्या सासू शुभांगी यांचेही धन्यवाद. हे टीमने मिळून केलं."
अनेक दिवसांपासून या सिनेमाची उत्सुकता सिनेप्रेमींना आहे. प्रसाद ओक यांच्या या आगामी सिनेमाचा फर्स्ट लुकही समोर आला होता. मात्र यात अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर लाल ओठणी असल्याने ही अभिनेत्री कोण हे समोर आलं नव्हतं. मात्र आता ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री अमृता खानविलकर असल्याचं बोललं गेलं. लेखक विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे.