By  
on  

पाहा Video : अमेय वाघने दिल्या 'सन किस्ड' फोटोच्या या जबरदस्त टिप्स

सोशल मिडीयावर काय ट्रेंड होईल आणि काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्या सन किस्ड फोटो हे सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पोस्ट केले जातात. आणि हे फोटो क्लिक करण्याच्या देखील काही टिप्स आहेत. अशाच काही टिप्स दिल्या आहेत अभिनेता अमेय वाघने.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

 

सोशल मिडीयावर अमेय वाघच्या अनेक पोस्ट पाहायला मिळतात. कधी अमेय एखादा कॉमेडी व्हिडीओ पोस्ट करतो तर कधी एखाद्या फोटोला भन्नाट कॅप्शन देतो. नुकताच एक व्हिडीओ अमेयने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. सन किस्ड फोटोच्या टिप्स अमेय यात विनोदी पद्धतिने देताना दिसतोय. क्षितिज पटवर्धन यांनी या व्हिडीओसाठी लेखन केलय. आणि एक जबरदस्त ह्युमर यात पाहायला मिळतोय.

सोशल मिडीयावर वाघचा स्वॅग तर कायम चर्चेत असतो. म्हणूनच अमेयने नुकतच त्याचं युट्यूब चॅनलदेखील सुरु केलं. या चॅनलवरही अमेयचे एन्टरटेनिंग व्हिडीओ पाहायला मिळतात. नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओत अमेय इन्स्टाग्राम फोटोंसाठीच्या इन्स्टंट टिप्स शेयर करताना दिसतोय.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive