By  
on  

पाहा Video : 'तेरी लाडली मैं..' मध्ये झळकतेय ही मराठी अभिनेत्री

वैविध्यपूर्ण भूमिकांमधून मराठी आणि हिंदी अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर अभिनेत्री हेमांगी कवी प्रेक्षकांचं मनोरंजन करते. लवकरच आणखी एका हिंदी मालिकेत हेमांगी झळकणार आहे. 'तेरी लाडली मै' या नव्या मालिकेत हेमांगी झळकणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hemangi Kavi (@hemangiikavi)

 

मुलीच्या जन्माचा विरोध करणारा पति आणि सासू आणि यात आपल्या मुलीला जन्म देणारी जन्मदाता आई मात्र आपल्या मुलीचा विचार करते, अशा संवेदनशील विषयावर ही मालिका आहे. या मालिकेत हेमांगी आईची भूमिका साकारत आहे. तेव्हा या मालिकेत आई-मुलीच्या नात्याची गोष्टही पाहायला मिळणार आहे. 

तेव्हा या मालिकेतील हेमांगीची भूमिका पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 'मुलगी झाली हो' या मराठी मालिकेचं हे हिंदी वर्जन आहे. मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री मयुरी कापडने झळकणार आहे. तर पंकज सिंह आणि संगीता पवार हे कलाकार देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive