नव्या वर्षाची सुरुवात नव्या जोमाने करता यावी यासाठी दुबईत एक खास फिल्म महोत्सव पार पडणार आहे. 'गल्फ सिने फेस्ट 2021' असं या महोत्सवाचं नाव आहे. नुकतच या महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या हस्ते हे लोगो अनावरण करण्यात आले. 20 ते 23 जानेवारी 2021 या कालावधीत हे महोत्सव पार पडणार आहे. महेश कोठारे यांनादेखील या सोहळ्याची उत्सुकता असल्याचं त्यांनी यावेळी सांगीतलं.
या सोहळ्यात अनेक मराठी सिनेविश्वातील कलाकार सहभागी असतील. याशिवाय देश - विदेशातील अनेक मान्यवर पाहुणे या सोहळ्याला हजर राहणार आहेत. या महोत्सवात काही निवडक आगामी मराठी सिनेमांचे प्रीमियर शो पार पडणार आहेत. याशिवाय काही मराठी सिनेमांचे ट्रेलर्स आणि गाण्यांची झलकही या महोत्सवात पाहायला मिळेल. तेव्हा दुबईत पार पडणार हे महोत्सवर कसं सगळ्यांचं लक्ष वेधतय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लॉकडाउनंतर होणाऱ्या या पहिल्या महोत्सवाची मराठी सिनेविश्वातील कलाकारांनी उत्सुकता असेल यात शंका नाही.