By  
on  

'भारत माझा देश आहे' या सिनेमात झळकणार हे कलाकार

'अहिंसा परमो धर्म:, धर्म हिंसा तथैव च:' अशी टॅगलाईन असलेल्या 'भारत माझा देश आहे' या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर झळकल्यानंतर आता चित्रपटातील कलाकारही प्रेक्षकांसमोर आले आहेत. या सिनेमाच्या पोस्टर रिलीजनंतर या सिनेमात कोण कलाकार झळकणार हे अद्याप समोर आलं नव्हतं. मात्र नुकतच या सिनेमातील स्टारकास्टची नावं समोर आली आहेत.

या सिनेमात मालिकेतील 'लाडू' या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेल्या राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत या बालकलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच अभिनेता मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम, हेमांगी कवी, नम्रता साळोखे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे.


   एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित 'भारत माझा देश आहे'ची कथा आणि दिग्दर्शन पांडुरंग कृष्णा जाधव यांनी केले आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद निशांत नाथाराम धापसे यांचे असून संगीत अश्विन श्रीनिवास यांचे आहे. तर समीर सामंत यांनी गीते लिहिली आहेत. चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांचे आहे.  

Author

Recommended

PeepingMoon Exclusive