By  
on  

पुढील वर्षी येणार विविध क्षेत्रांमधील फॅशनला गौरवणारा मराठीमधील हा पहिला पुरस्कार

मराठी मनोरंजन विश्वात विविध पुरस्कार सोहळे रंगतात. यातच आता आणखी एक भर पडली आहे. विविध क्षेत्रांमधील फॅशनला गौरवण्यात येणारा पहिला मराठी पुरस्कार पुढील वर्षी म्हणजेच 2021मध्ये भेटीला येत  आहे. 'M'TOWN STYLE AWARD- CELEBRATING FASHION' असं या पुरस्कार सोहळ्याचं नाव आहे. मराठी मनोरंजन विश्वातील फॅशन ही जगभरात पोहोचावी यासाठीचा हा प्रयत्न आहे. या नव्या उपक्रमात मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसिरीज, थिएटर, स्पोर्ट्स, मीडिया अशा विविध भागांमधील व्यक्तिंचा गौरव करण्यात येईल. 

या पुरस्कार सोहळ्याची सर्वेसर्वा आणि आत्तापर्यंत सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या प्रेरणा सुर्यवंशीने पिपींगमून मराठीशी बोलताना याविषयीची अधिक माहिती दिली आहे. ती सांगते की, "मराठी इंडस्ट्रीत स्टाईल स्टेटमेंटमध्ये झालेला बदल निश्चितच उल्लेखनीय आहे आणि म्हणून या फॅशन, स्टाईलची दखल घेण्याच्या उद्देशाने मी  'M'TOWN STYLE AWARD'चे आयोजन करत आहे. हा मुख्य उद्देश असला तरी महाराष्ट्रातील उभरते डिझायनर्स, स्टाईलिस्ट यांना प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळवून देण्याचाही माझा हेतू आहे. हा पुरस्कार केवळ सिनेसृष्टीसाठी मर्यादित नसून टेलिव्हिजन, वेबसिरीज, थिएटर, डिजिटल मीडिया, स्पोर्ट्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना देण्यात येईल. मला असे वाटते,  'M'TOWN STYLE AWARD' हा मराठीतील पहिला पुरस्कार सोहळा असेल जो, केवळ फॅशन आणि स्टाईलला समर्पित करण्यात आला आहे."

तेव्हा नव्या वर्षात भेटीला येणारा हा नवा पुरस्कार सोहळा कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असेल यात शंका नाही. नुकतच या पुरस्कार सोहळ्याचा लोगो प्रदर्शित करण्यात आला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive