अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांची लग्नाची तारीख आता समोर आली आहे. नुकत्याच एका प्रसिद्ध पोर्टलने दिलेल्या मुलाखतीत मानसीने तिच्या लग्नाची तारीख अनाउंस केली आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2021मध्ये मानसी प्रदीपसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 19 जानेवारी रोजी पुण्यात हा विवाहसोहळा संपन्न होईल.
एका प्रसिद्ध पोर्टलला मानसीने या लग्नाविषयीच्या कार्यक्रमांचीही माहिती दिली आहे. परिवार मंडळी आणि जवळच्या मित्रमैत्रीणींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. 18 जानेवारी रोजी मानसी-प्रदीपचा मेहेंदी आणि संगीत सोहळा पार पडणार आहे. लग्नाच्या दिवशी सकाळी हळदी समारंभ पार पडणार आहे.