By  
on  

पाहा Video : "कजरा मोहब्बत वाला.." गाण्यावर थिरकल्या फुलवा आणि प्राजक्ता

जुन्या गाण्यांची मजा काही औरच असते. मग त्या गाण्यांवर एखादा परफॉर्मन्स करायला किंवा ती गाणी गायला अनेकांना आवडतं. असाच एका प्रसिद्ध जुन्या गाण्यावर एक डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत आला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्तासोबत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर दिसतेय.

निमित्त होतं एका शूटिंगचं. प्राजक्तासोबत फुलवा आणि तिची टीम असल्यामुळे दोघींना डान्स व्हिडीओ करण्यावाचून रहावलं नाही. मग काय दोघींनी केला हा डान्स व्हिडीओ. "कजरा मोहब्बत वाला" या प्रसिद्ध गाण्यावर दोघी सुंदर थिरकल्या. दोघींना नृत्याची आवड आणि त्याचं शिक्षण घेतलेल्या या नृत्यप्रेमींनी जबरदस्त परफॉर्म केलं आहे. अचानक शूटिंगच्या सेटवर केलेला हा डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत.

 

"प्राजक्ता या पोस्टमध्ये लिहीते की, "जेव्हा तुम्हाला कळतं की तुमचं शूट पोस्टपॉन झालेलं आहे आणि जेव्हा फुलवा आणि तिची टीम आसपास असते.. तेव्हा आपण कसे नाचू शकत नाहीत."

प्राजक्ता आणि फुलवा शूटिंग करत असताना अचानक शूटिंग पुढे ढकलण्यात आलं. हे कळताच फुलवा आणि प्राजक्ताने हा डान्स व्हिडीओ केला. फुलवाचे असे अनेक डान्स व्हिडीओ तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात. फुलवा आणि अभिनेत्री उर्मिला कोठारेचे डान्स व्हिडीओही सोशल मिडीयावर चर्चेत आले होते. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive