By  
on  

शुभ्राकडून सोहमला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, आशुतोषसाठी तेजश्रीची खास पोस्ट

'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. या मालिकेचे असंख्य चाहते आहेत. मालिकेच्या कहाणीसोबतच या मालिकेतील कलाकारांनी साकारलेली विविधं पात्रेदेखील प्रेक्षकांची आवडती आहेत. या मालिकेत जशी सासू-सूनेची, आई-मुलाची जोडी प्रसिद्ध आहे तशीच शुभ्रा आणि सोहमची जोडीही प्रसिद्ध आहे. ऑनस्क्रिन यांचे विचार जुळत नसले तरी ऑफस्क्रिन मात्र दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. सोहमच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता आशुतोष पत्की आणि शुभ्राच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हे दोन्ही कलाकार खऱ्या आयुष्यात चांगले मित्र आहेत.

नुकतच आशुतोषच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच तेजश्रीनेही त्याला सोशल मिडीयावर खास शुभेच्छा दिल्या आहेत. तेजश्रीने आशुतोषसोबतचा फोटो शेयर केला आहे. याशिवाय दोघ एकत्र सायकल राईड करतानाचा व्हिडीओ देखील या पोस्टमध्ये पाहायला मिळतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Author

Recommended

PeepingMoon Exclusive