By  
on  

आगामी सिनेमात प्राजक्ता माळी झळकणार या अभिनेत्यासोबत, शूटिंग केलं पूर्ण

अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतच तिच्या आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या सिनेमाचं शूटिंग नुकतच पूर्ण करण्यात आलं आहे. जुन्नरमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण सुरु होतं. नुकतच सोशल मिडीयावर प्राजक्ताने याविषयी माहिती दिली आहे.

या सिनेमात अभिनेत्री प्राजक्ता माळी ही अभिनेता अंकुश चौधरीसोबत झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. लकडाउन असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमाचं चित्रीकरण नुकतच पूर्ण झालं आहे. यासाठी प्राजक्ताने एक खास पोस्ट केली आहे. सिनेमाच्या सेटवरील काही फोटो प्राजक्ताने शेयर केले आहेत.

 

प्राजक्ता या पोस्टमध्ये लिहीत के. "आणि हे पूर्ण केलं. धन्यवाद इष्णव मिडीया माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. धन्यवाद संतोष मांजरेकर मला स्वातंत्र्य देण्यासाठी.   धनंजय कुलकर्णी सतत कुल स्माईलसाठी धन्यवाद. फुलवा तुला खूप प्रेम. आणि मी अंकुश चौधरीचे कसे धन्यवाद करू खूप उदार आणि मैत्रीपूर्ण कोस्टार असण्यासाठी ?  लकडाउनच्या सेटवर मी खूप खूप आरामदायी होते. आणि शेवटचं म्हणजे जुन्नरमध्ये असणं आवडलं."

प्राजक्ताच्या या पोस्टवरून ती या शूटदरम्यान आनंदी असल्याचं पाहायला मिळतय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive