शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचे आता असंख्य चाहते आहेत. सोशल मिडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनंतर अपूर्वाचा एक मोठा फॅनबेस तयार झाला आहे. आणि आता अपूर्वा पम्मीच्या भूमिकेत दिसत आहे. या सगळ्या लाईमलाईटमध्येही अपूर्वाला कायम तिच्या वडिलांची आठवण येत असते. काही वर्षांपूर्वी अपूर्वाच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला होता.
नुकतीच अपूर्वाने वडिलांच्या आठवणीत भावुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अपूर्वा लिहीते की, "मी बऱ्याच वर्षात तुमचा आवाज ऐकला नाही. पण माझं हदय तुमच्यासोबत रोज संवाद साधतं. 23 डिसेंबर जेव्हा देव तुम्हाला घेऊन गेला. मी तुमच्यावर प्रेम करते पा..."
काही वर्षांपूर्वी याच दिवशी अपूर्वाला पितृशोक झाला होता. मात्र वडिलांच्या आठवणी कायम अपूर्वासोबत असतात.