By  
on  

अवधूत गुप्तेच्या पहिल्या वहिल्या रॅप साँगचं टीझर प्रदर्शित, जातीवर केलं भाष्य

गायक, संगीतकार. दिग्दर्शक, निर्माता अवधूत गुप्ते त्याचं पहिलं वहिलं रॅप साँग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आत्तापर्यंत विविध रॉक साँक, कव्वाली या सगळ्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठी विविध गाण्यांचे प्रयोग करणारा अवधूत आता एक रॅप साँग घेऊन आला आहे. समीर सामंत यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले असून विक्रम बाम यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे.  

नुकताच अवधूत गुप्तेच्या या रॅप साँगचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात जातीवर भाष्य करण्यात आलं आहे. माणूसकी हीच खरी जात हा एक महत्त्वपूर्ण संदेश यात देण्यात आला आहे. रॅप साँगची कल्पना कशी सुचली याबाबत अवधूत गुप्ते सांगतो की, ''आजवर मी गाण्यांचे विविध प्रकार हाताळले, चित्रपट, कॉन्सर्ट केले. परंतु काहीतरी राहून गेल्याचे सतत जाणवत  होते आणि त्यातूनच मग या रॅप सॉंगची संकल्पना सुचली. अनेकांना वाटत असेल, की रॅप सॉंगसाठी असा ज्वलंत विषय का निवडला? तर आज आपण कितीही म्हटले, तरी अनेकदा हा मुद्दा डोकं वर काढतोच. समाजात इतर जातींपेक्षा माणूसकी ही एकच जात जास्त महत्त्वाची आहे, हे सांगण्याचा प्रांजळ प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे.''  

लवकरच हे रॅप साँग प्रदर्शित होणार आहे. सध्याच तरुणाईला रॅपचं वेड लागलेलं असताना अवधूतचं गाणंही त्यांचं लक्ष वेधेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive