अभिनेत्री अमृता खानविलकर ही मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील स्टाईल आयकॉनपैकी एक आहे. विविध कार्यक्रमात, पुरस्कार सोहळ्यातही ती प्रत्येक स्टाईल अगदी सहजपणे कॅरी करताना दिसते. अनेकदा अमृता तिच्या स्टाईल टीमसोबत मिळून स्टाईल एक्सपेरिमेंटही करताना दिसते.
सध्या हिवाळ्यात अमृताचा विन्टर लूक पाहायला मिळतोय. हाच विन्टर लूक अमृताने सोशल मिडीयावर शेयर केला आहे. चॉकलेटी रंगाच्या ड्रेसवर डेनीम जॅकेट असा अमृताचा हा लूक आहे. या सिम्पल लुकमध्येही अमृता सुंदर दिसतेय.
सोशल मिडीयावरील तिच्या चाहत्यांनाही तिचे हे फोटो प्रचंड आवडले आहेत.