By  
on  

आली समीप लग्नघटिका, सई आणि आदित्यचं होणार लग्न

 'माझा होशील ना' या मालिकेतील नव्या रंजक घडामोडींनी प्रेक्षकांना खिळवून ठेवल आहे. यात आता मालिकेचा नवा प्रोमो सोशल मिडीयावर चर्चेत आला आहे. या प्रोमोने उत्कंठा आणखी ताणली गेली आहे. ज्यात सई आणि आदित्यच्या लग्नानंतर सई मामांच्या हट्टापायी उखाणा घेताना दिसत आहे.

आदित्यला दापोलीमध्ये गाठून सईने तिचे प्रेम जाहिर केले. पण आदित्यने सईला नकार दिला. मात्र आता आदित्य आणि सईचं लग्न होणार आहे. सई आणि आदित्य एकमेकांपासून दूर होतानाही ते एकत्र आले आहेत, हे पाहायला मिळणार आहे.

सई आणि आदित्यचा एकमेकांपासून विलग होण्यापासून ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्यापर्यंतचा भन्नाट प्रवास आता दिसणार आहे. लग्नघटिका समीप तर येतेय, पण तोवर काय काय 

नव्या अडचणी आणि क्षण येतील हे मालिकेच्या पुढील भागांमधून समोर येईल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive