By  
on  

सिद्धार्थ-मितालीच्या केळवणाला कोस्टार सानियाची हजेरी

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पुढील वर्षी दोघं लग्नाच्या बेडीत अडकतील. त्यामुळे सध्या दोघांच्या केळवणाचे कार्यक्रम सुरु आहेत. तर दुसरीकडे सिद्धार्थची नवी मालिका सांग तू आहेस ना देखील सुरु आहे.

या मालिकेतील सिद्धार्थचे सहकलाकार शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरीसोबत सिद्धार्थची चांगली मैत्री आहे. याच निमित्ताने त्याचे कोस्टारही या केळवणात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतय. सानियाने नुकतचे सिद्धार्थ आणि मितालीसोबतचे काही फोटो शेयर केले आहेत. सानिया या दोघांसाठी केळवण केल्याचं पाहायला मिळतय.

तेव्हा मितालीची सिद्धार्थच्या कोस्टारसोबतची मैत्री पाहायला मिळतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive