यावर्षी कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनच्या काळात सिनेमागृहेदेखील बंद होती. त्यामुळे सिनेप्रेमींना सिनेमागृहात जाऊन सिनेमे पाहण्याचा आस्वाद घेता येत नव्हता. यातच नुकतीच सिनेमागृहे सिनेमाप्रेमींसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर आता मोठ्या कालावधीनंतर पुन्हा सिनेमे सिनेमागृहात पाहता येत आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळीनेदेखील ही संधी साधून बऱ्याच महिन्यांनी सिनेमागृहात सिनेमा पाहण्याचा आनंद लुटला आहे. प्राजक्ताने थिएटरमध्ये सेल्फि क्लिक करून सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. यासोबतच या पोस्टचं कॅप्शन लक्षवेधी ठरतय. भीत जगण्यापेक्षा संपूर्ण आनंद घेत जगण्याविषयी ती या पोस्टमध्ये लिहीते.
प्राजक्ता या पोस्टमध्ये लिहीते की, "अखेर... थिएटरमध्ये म्हणजेच दुसरं घर (सुरक्षिततेचे सगळे नियम पाळत). 70mm ची जादू कधीच जाऊ शकत नाही. मी हे खूप मिस करत होते. करोना अजून किती दिवस राहिल माहित नाही, पण तो पर्यंत काय भीत भीत जगायचं? हट्... आयूष्याचा संपुर्ण आनंद घेत, योग्य ती काळजी घेत जगायचं. - अपून का फंडा"
अपून का फंडा म्हणत प्राजक्ताने हे कॅप्शन लिहीलं आहे.