अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांनाही प्राण्यांची प्रचंड आवड आहे. दोघही प्राणीप्रेमी आहेत. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात डोरा नावाची गोंडस डॉग पेट देखील आहे. मात्र या दोघांच्या आयुष्यात आता एक नवी पाहुणी आली आहे. मितालीने नुकतच सिद्धार्थ करत असलेली मालिका सांग तू आहेस का च्या सेटवर एका कुत्र्याच्या पिल्लाला वाचवलं आहे. आणि याच गोंडस पिल्ल्यांन सेटवर सगळ्यांनाच वेड लावलं आहे.
या मालिकेत सिद्धार्थची सहकलाकार शिवानी रांगोळेही सेटवर या पिल्लाला सोबत घेऊन असते. शिवानीने तर तिचं नाव होप असं ठेवलं आहे. सिद्धार्थ आणि मिताली या छोट्या पिल्लासोबत मस्ती करत आहेत. नुकताच दोघांनी सोशल मिडीयावर एक क्यूट व्हिडीओ शेयर केला आहे. या पिल्लासोबत सिद्धार्थ आणि मिताली या वर्षांचा शेवटचा दिवस घालवत असल्याचं पाहायला मिळतय.
लवकरच या पिल्लाला लस देण्यात येईल आणि एडॉप्शनसाठी देण्यात येईल असं सिद्धार्थने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलय. या पिल्लाच्या येण्यानं सिद्धार्थ-मितालीची पेट डॉग डोरा मात्र पजेसिव्ह झाल्याचं पाहायला मिळतय. हा मजेशीर व्हिडीओ सिद्धार्थने सोशल मिडीयावर शेयर केला आहे.