By  
on  

'गुलाबमजामून'मध्ये अभिषेक-ऐश्वर्या आठ वर्षांनंतर एकत्र झळकणार

अभिषेक-ऐश्वर्या आठ वर्षानंतर एकत्र  म्हणजे नक्की काय याचा तुम्हाला प्रश्न पडला असेलच, म्हणूनच सांगतो हे दोघेही सिल्व्हर स्क्रिनवर तब्बल आठ वर्षानंतर एकत्र पुनरागमन करत आहेत. बच्चन कुटुंबातील हे रिअल लाईफ रोमॅंण्टिक कपल आता आपली ऑन-स्क्रिन केमिस्ट्री पुन्हा दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. अभिषेक-ऐश्वर्या ही जोडी ‘रावण’ या सिनेमात शेवटची पाहायला मिळाली. त्यापूर्वी त्यांनी ‘गुरू’, ‘कुछ ना कहो’, ‘ढाई अक्षक प्रेम के’ आदी सिनेमांमधून एकत्र काम केले.

 

‘गुलाबजामून’ या आगामी सिनेमाद्वारे अभिषेक-ऐश्वर्या एकत्र झळकत आहेत. काही दिवसांपूर्वी अशी माहिती मिळाली होती, की दोघेही हे प्रोजेक्ट करत नाहीत. पण नुकत्याच सुत्रांच्या माहितीनुसार अनुराग कश्यपच्या या प्रोजेक्टमध्ये अभिषेक-ऐश्वर्याच प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. सर्वेश मेवारा या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाच्याची अधिकृत घोषणा लवकरच फॅंटम फिल्म्सद्वारे करण्यात येईल. दोघांच्याही चाहत्यांना त्यांना पुन्हा एकत्र पाहण्याची प्रचंड उत्सुकता आहे.

ऐश्वर्या सध्या तिच्या आगामी ‘फन्ने खान’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून हा सिनेमा येत्या ३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यात ती एका रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे व अभिनेते अनिल कपूर यांना तिच्या वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळेल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive