पाहा Photos : "तू मला चांगल्यासाठी बदलले" म्हणत मानसी नाईकने शेयर केले हे फोटो

By  
on  

अभिनेत्री मानसी नाईक याच महिन्यात म्हणजेच 19 जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत ती लग्नबंधनात अडकणार आहे. मागील वर्षी 2020 मध्ये दोघांनी साखरपुडा देखील केला होता. शिवाय मानसीने तिच्या वाढदिवसाला प्रेमाची कबुली देत प्रदीप सोबतच्या रिलेशनचा खुलासा केला होता.

मानसी आणि प्रदीपच्या लग्नाला काहीच दिवस बाकी असताना या सुंदर कपलचे आणखी काही फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत. मानसीने प्रदीपसोबत काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये मानसी काळ्या रंगाच्या सुंदर गाउनमध्ये दिसतेय. तर प्रदीपने पांढऱ्या रंगाच्या आउटफिटवर लाल रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. दोघांची हटके जोडी सोशल मिडीयावरही चर्चेत आहे. या पोस्टमध्ये मानसीने खास कॅप्शनही लिहीलं आहे. शिवाय प्रदीपने तिला चांगल्यासाठी बदललं असल्याचं ती या कॅप्शनमध्ये शेवटी लिहीते.

 

तेव्हा आता दोघांच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमाच्या फोटोंकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. 19 जानेवरा 2021 रोजी पुण्यात मानसी-प्रदीपचा विवाहसोहळा पार पडेल.

Recommended

Loading...
Share