By  
on  

नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकरला मिळाली ही खास भेटवस्तू

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकरला नुकतच एक खास गिफ्ट मिळालं आहे. अभिनेत सुनील बर्वे यांच्या पत्नी अपर्णा यांनी रेखाटलेलं चित्र फुलवाला गिफ्ट म्हणून दिलं आहे. नृत्यावर आधारित ही पेटिंग पाहुन फुलवाला प्रचंड आनंद झाला आहे. 

फुलवा लिहीते की, "या सुंदर भेटवस्तूसाठी खूप धन्यवाद. एक कलाकार म्हणून मला तू कायम आवडतेस आणि त्याही पेक्षा एक चांगली व्यक्ती म्हणूनही. धन्यवाद सुनील बर्वे हा फोटो कॅप्चर करण्यासाठी.'

 फुलवाने सोशल मिडीयावर या पेटिंगसोबतचे फोटोही शेयर केले आहेत. सुनील बर्वे यांनी स्वत: फुलवाचे हे फोटो क्लिक केले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive