By  
on  

मालिका विश्वातील ही प्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, केला हा लुक

अनेक मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री मृणाल दुसानिसने तिचा लुक बदलला आहे. 'हे मन बावरे' ही मालिका संपल्यानंतर मृणालचा नवा लुक पाहायला मिळतोय. सोशल मिडीयावर मृणालने पतिसोबतचा फोटो शेयर केला आहे. या फोटो मृणालचा शॉर्ट हेअरकट लुक पाहायला मिळतोय.

2016 मध्ये मृणाल विवाहबंधनात अडकली होती. पुण्याच्या नीरज मोरेसोबत मृणालने लगीनगाठ बांधली होती. नीरज हा कामानिमित्ताने अमेरिकेत स्थायिक आहे. त्यामुळे मृणालही शुटिंग सांभाळत अधूनमधून तिथे जात असे. मात्र आता मालिका संपल्यानंतर मृणाल पुन्हा नीरजसोबत क्वालिटी टाईम घालवतेय. मात्र मृणालच्या नव्या लुकने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive