By  
on  

सिद्धार्थ - मितालीसाठी डिझायनर विक्रम फडणीसने आयोजित केलं केळवण

 यावर्षी अनेक सेलिब्रिटींची लग्नसोहळे पार पडणार आहेत. नुकतच अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांचा लग्नसोहळा पार पडला. आणि लवकरच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे गोड कपल लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या या दोघांच्या केळवणाचे कार्यक्रम सुरु आहेत.

प्रसिद्ध डिझायनर विक्रम फडणीसनेही सिद्धार्थ आणि मितालीला केळवणासाठी बोलावले होते. या निमित्ताने खास गेटटुगेदर कार्यक्रमही करण्यात आला होता. सिद्धार्थ-मितालीसह यावेळी अभिनेता ललित प्रभाकर, हेमंत ढोमे, क्षिति जोग देखील उपस्थित होते. सिद्धार्थने या खास भेटीचा क्षण असलेला फोटो सोशल मिडीयावर शेयर केला आहे.

सिद्धार्थ या पोस्टमध्ये लिहीतो की, "आपल्या आवडत्या लोकांना आपणही तितकेच आवडतो... ह्याहून मोठं सुख नाही. थँक यु  विक्रम फडणीस. तू एक अप्रतिम होस्ट आणि तितकाच अप्रतिम मित्र आहेस. धन्यवाद."

 

तेव्हा या केळवणाच्या कार्यक्रमांनंतर सिद्धार्थ - मिताली यांचं लग्न सगळ्याचंच लक्ष वेधेल यात शंका नाही.

याचवर्षी अनेक सेलिब्रिटींचे लग्नसोहळे पार पडणार आहेत. अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेराचं लग्न येत्या 19 जानेवारी रोजी पार पडेल. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही याच वर्षी फियान्से कुणालसोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive