By  
on  

पाहा Photos : 15 सेकंदच्या प्रोमोसाठी या अभिनेत्रीने नदीच्या पात्रात उतरुन असं केलं शूटिंग

गेल्या काही दिवसांपासून तेरी लाडली मै या मालिकेचा प्रोमो चर्चेत आला होता. ही नवी मालिका एका वेगळ्या विषयासह प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मात्र त्या छोट्याश्या प्रोमोमागे किती जणांची आणि कशी मेहनत असते हे अनेकांना माहितीही नसेल. म्हणूनच की काय त्या प्रोमोचा अनुभव अभिनेत्री हेमांगी कवीने शेयर केला आहे. त्या प्रोमोतील काही सेंकदच्या शॉटसाठी हेमांगी आणि मालिकेच्या टीमला काय काय करावं लागलं हे हेमांनी तिच्या सोशल मिडीया पोस्टवरून सांगतेय.

या शॉटसाठी हेमांगीला भर थंडीत नदीच्या पात्रात उतरून सुर्योदय झाल्यावर शूट करायचं होतं.  यासाठी असिस्टंट डायरेक्टर, कॅमेरामन, हेअर-मेकअप करणारे यांच्यासह लाईट दादा वैगेर क्रू मेंबर पाण्यात उतरले होते. सकाळी सहा वाजता या सीनचा शॉट घेण्याचं ठरलं होतं. या 15 सेकंदच्या प्रोमोसाठी बरीच मेहनत करावी लागली होती. आणि हाच संपूर्ण अनुभव हेमांगीने या पोस्टमध्ये सविस्तर शेयर केला आहे.

या शूट दरम्यानचे फोटोही हेमांगीने पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये शेवटी हेमांगी लिहीते की, "सर्व कलाकार, तंत्रज्ञ, निर्माता, वाहिनी या सगळ्यांची ही मेहनत सार्थ ठरेल असं आतून वाटतंय यासाठी तुमची साथ हवी! बाकी काही नको!"

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive